Phone +91 8779409460

गृहिणींसाठी खास दोन दिवसीय सर्टिफिकेट कोर्स

गृहिणी म्हणजे घराचा आधारस्तंभ! बारीक-सारीक गोष्टींवर लक्ष असलेली घरातील एक अधिकारी व्यक्ती! समाजाचा अतिशय महत्त्वपूर्ण घटक! गृहिणीच्या हातात असतं कचऱ्याने भरलेल्या या जगात आपल्या घराला आणि आपल्या परिसराला कचरामुक्त करणं… तेव्हा सर्व गृहिणींनी एकत्र येऊन आपापल्या घरातील कचऱ्याचे योग्यरित्या व्यवस्थापन केले तर नक्कीच आपले एक पाऊल प्रगतीच्या दिशेने पडेल. हे व्यवस्थापन नेमके कसे करावे याची दिशा दाखवणारा हा कोर्स आहे.

खरं तर कोर्सला सर्वांचंच स्वागत आहे. घनकचरा व्यवस्थापन हा सर्वांसाठीचा विषय आहे, याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. मात्र समाजातील प्रत्येक घटक हा वेगळ्या-वेगळ्या प्रकारच्या कचऱ्याची निर्मिती करतो. त्यामुळे त्याची व्यवस्थापनाची पद्धतदेखील बदलते. जसे की, विद्यार्थीदशेत निर्माण होणारा कचरा हा वृद्धकाळात निर्माण होणाऱ्या कचऱ्यापेक्षा वेगळा असतो. म्हणूनच वेगळ्या वयोगटासाठी, वेगळ्या व्यवसायासाठी, वेगळा कोर्स घडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. तसाच गृहिणींसाठी खास हा कोर्स घडवण्यात आला आहे.

कोर्समध्ये कचऱ्याचे प्रकार, त्याचे वर्गीकरण, खतनिर्मिती, पुनर्प्रक्रिया, पुनर्वापर या सर्व गोष्टींचा आढावा तर घेतला जातोच, शिवाय एक नागरिक म्हणून घरात आणि घराबाहेर आपण काय-काय करू शकतो याबाबतही चर्चा होते.

या कोर्सची निर्मिती करण्यासाठी ‘सिक इंडिया प्रा. लि.’ यांनी मोलाचे योगदान दिल्याबद्दल आम्ही त्यांचे शतशः ऋणीआहोत. तसेच आजवर या कोर्सला आलेल्या सर्वांनीच या कोर्सची ताकद ओळखून आम्हाला सतत प्रोत्साहन दिल्याबद्दल सर्व सहभागींचेही आभार!

गृहिणींसाठी खास घडवलेला हा कोर्स विनामूल्य उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न आहे. याकरिता दर महिन्याला एक विनामूल्य वर्ग ऑनलाईन भरवला जातो. त्याचे तपशील वेळोवेळे पुढील संकेतस्थळावर दिले जातात. कोर्सला नोंदणी करण्यासाठी कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी.

https://linktr.ee/gwtindia.org

शिवाय, सदर कोर्स आपणांस विशिष्ट समुहासाठी ऑनलाईन स्वरूपात, विशिष्ट मंडळात, संकुलात, संस्थेत इत्यादी ठिकाणी घ्यावयाचा करायचा असल्यास आपण याचे सशुल्क आयोजन करू शकता. कोर्स घेण्याकरता ग्रीन वर्कस् ट्रस्टकडून काही तज्ज्ञ हे आपल्या नियोजित ठिकाणी येऊन घनकचरा व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन करू शकतील. आपल्या सोयीनुसार कोर्सचे आयोजन करण्याकरिता खालील शुल्क आकारले जातील –

  • कोर्स ऑनलाईन घेण्याकरिता – रू. ३०००/-
    प्रवेश मर्यादा – जास्तीत जास्त १०० सहभागी
  • कोर्स नियोजित ठिकाणी घेण्याकरिता – रू. ४०००/- (प्रवास + भोजन + निवासव्यवस्था) येथे प्रवेश मर्यादा नाही.

हा कोर्स विनामूल्य स्वरूपात सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा मानस आहे. मात्र त्याकरिता निधीची आवश्यकता आहे. आपणांस हा कोर्स व संस्थेचे इतर कार्य आवडत असल्यास आपण संस्थेला आवर्जून आर्थिक साहाय्य करावे, ही नम्र विनंती.

कोर्सबद्दल व संस्थेच्या घनकचरा व्यवस्थापन संबंधित उपक्रमांबद्दल अधिक जाणून घेण्याकरिता कृपया खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
रुपाली नाईक – 9359859380
वेळ – सकाळी १० ते सायंकाळी ५